
गेल्या 10 वर्षांपासून महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत. अन्यायाविरुद्ध बंड पुकारून लढणारी आणि संविधानाचे रक्षण करणारी एक अभेद्य चळवळ..
पीडित, शोषित आणि दुर्बळ घटकांवरील अन्यायाविरुद्ध आम्ही तीव्र आवाज उठवतो. आणि त्यांना संवैधानिक न्याय मिळवून देण्यासाठी तळमळीने काम करतो

“भिवंडी शहरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत शांततामय आणि लोकशाही मार्गाने सामाजिक आंदोलन आयोजित केले. या आंदोलनाचा मुख्य उद्देश भिवंडी शहरातील सामाजिक सलोखा, एकता, न्याय, व सुरक्षित भवितव्य यासाठी जनजागृती करणे हा होता.
भिमपँथर बहुजन फाउंडेशन(भारत)
संस्थापक राष्ट्रीय_अध्यक्ष!.
भिमपँथर आशिष अरविंद जाधव.

“स्त्रीवर अन्याय सहन नाही – न्याय मिळेपर्यंत संघर्ष चालूच राहील.”
भिमपँथर बहुजन फाउंडेशन (भारत) महिलांच्या सन्मान, सुरक्षितता व न्यायासाठी सदैव सज्ज आहे. कोणतीही महिला एकटी नाही—आम्ही तिच्या पाठीशी आहोत.
भिमपँथर बहुजन फाउंडेशन (भारत) ही संस्था महिलांवरील अन्याय, शोषण व अत्याचाराविरोधात ठामपणे उभी राहणारी सामाजिक चळवळ आहे. स्त्री ही सन्मान, सुरक्षितता व समान हक्कांची अधिकारी आहे, या मूल्यांवर आमचा ठाम विश्वास आहे.
आम्ही महिलांवर होणाऱ्या घरगुती हिंसाचार, लैंगिक शोषण, मानसिक छळ, सामाजिक अन्याय व भेदभावाविरोधात संविधानिक, कायदेशीर व शांततामय मार्गाने लढा देतो.
भिमपँथर बहुजन फाउंडेशन(भारत)
संस्थापक राष्ट्रीय_अध्यक्ष!.
–भिमपँथर आशिष अरविंद जाधव.
आमचे कार्य
महागड्या शस्त्रक्रिया व उपचारांसाठी आर्थिक अडचणीत असलेल्या गरीब व गरजू रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी संस्था समन्वयकाची भूमिका बजावते.
आम्ही पुढील माध्यमांतून मदत करतो:
अशा शस्त्रक्रिया व उपचार अल्प दरात किंवा मोफत मिळवून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो.
सर्वसामान्य बहुजनांकडून वर्षानुवर्ष राब- राब काम करून घेणे👆 त्यानंतर दरमहा योग्यरित्या हिशोबाने गोरगरीबांचे मेहनतीचे पैसै देण्यास भटूकड्याकडून टाळाटाळ होणे 👆 अश्या कृत्य करणाऱ्या मनूवाद्यांना पँथर स्टाईल ने धडा शिकवणारे…..


कायदेशीर व सामाजिक मार्गदर्शन

महिलांसाठी ठाम उभे राहणारी संस्था

बहुजन समाजासाठी जनजागृती मोहीम

गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन

युवकांसाठी कला व क्रीडा उपक्रम

संस्थेच्या वतीने गरजू नागरिकांना अन्नधान्य किट्स, जेवणाचे पॅकेट्स, मास्क, सॅनिटायझर व औषधांचे वितरण करण्यात आले. तसेच स्थलांतरित मजूर, वृद्ध, महिला, दिव्यांग व रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबांना विशेष मदत करण्यात आली

आमचे खंबीर नेतृत्व
भिमपँथर बहुजन फाउंडेशन चें शिलेदार, जे अहोरात्र समाजातील अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आणि संस्था बळकट करण्यासाठी झटत आहेत….























