
भिमपँथर बहुजन फाउंडेशन (भारत) ही भारत सरकार नोंदणीकृत सामाजिक संस्था असून बहुजन समाज, महिला, गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी कार्य करणारी एक संघर्षशील व सेवाभावी चळवळ आहे.
संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता व सामाजिक न्याय या मूल्यांवर आधारित राहून संस्था समाजातील अन्याय, शोषण व अत्याचाराविरोधात ठामपणे उभी आहे.
आमची संस्था केवळ आंदोलनापुरती मर्यादित नसून, प्रत्यक्ष कृती, मदत व मार्गदर्शन या माध्यमांतून समाजपरिवर्तन घडवण्यावर विश्वास ठेवते

समाज परिवर्तनासाठी दिलेले १0 वर्षांचे योगदान
भिमपँथर बहुजन फाउंडेशन नें केवळ अन्यायाविरुद्ध आवाजच उठवला नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून हजारो पीडितांना न्याय मिळवून दिला आहे. संविधानात्मक मार्गाने लढा उभारून आम्ही समाजात एक सकारात्मक बदल घडवून आणला आहे. आमचा लढा हा केवळ एका समूहासाठी नसून, संविधानाच्या रक्षणासाठी आहे.
.



महिलांवरील सर्व प्रकारच्या अत्याचारांविरोधात ठाम, संविधानिक व संघटित लढा उभारणे

गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रियांसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे

पंतप्रधान वैद्यकीय मदत निधी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व विविध ट्रस्ट यांच्या माध्यमातून गरजूंना लाभ मिळवून देणे

महिलांच्या हक्कांविषयी, आरोग्य व कायदेशीर बाबींविषयी जनजागृती करणे

बहुजन समाजाचे संघटन करून सामाजिक न्याय, समता व धर्मनिरपेक्ष मूल्ये बळकट करणे

महिला अत्याचार, वैद्यकीय मदत व सामाजिक अन्यायाबाबत तक्रार स्वीकारून प्राथमिक माहिती व कागदपत्रे नोंदवली जातात..

पीडित महिला व गरजू व्यक्तींना मानसिक, सामाजिक व कायदेशीर मार्गदर्शन देऊन योग्य दिशा दिली जाते.

पोलीस, प्रशासन, आरोग्य विभाग, सरकारी निधी व ट्रस्ट यांच्या माध्यमातून न्याय, उपचार व सहाय्य मिळवून दिले जाते

न्याय व मदत पूर्ण होईपर्यंत सातत्यपूर्ण पाठपुरावा करून महिलांना व गरजूंना आत्मसन्मानाने सक्षम केले जाते

स्त्री, बहुजन व समाजातील वंचित घटकांना भीतीविना, सन्मानाने व सुरक्षिततेने जगता येईल असा;
अत्याचार, शोषण, भेदभाव व अन्यायमुक्त समाज निर्माण करणे.
जिथे प्रत्येक महिलेला तिच्या हक्कांची जाणीव, न्यायाची खात्री, आरोग्यसेवा व सामाजिक आधार मिळेल;
आणि आर्थिक दुर्बलतेमुळे कोणाचाही उपचार, शिक्षण किंवा मानवी सन्मान नाकारणे जाणार नाही,
असा समतामूलक, मानवतावादी व संविधानमूल्यांवर आधारित भारत घडवणे.