कोरोना महामारीतील Bhimpanther Bahujan Foundation चे कार्य

कोरोना महामारीच्या कठीण काळात Bhimpanther Bahujan Foundation ने समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून गरजू व वंचित घटकांसाठी मोलाचे योगदान दिले. लॉकडाऊन व आरोग्य संकटाच्या काळात अनेक कुटुंबे उपजीविकेपासून व मूलभूत सुविधांपासून वंचित राहिली होती. अशा वेळी संस्थेने मानवतेच्या भावनेतून विविध सेवा उपक्रम राबवले.

संस्थेच्या वतीने गरजू नागरिकांना अन्नधान्य किट्स, जेवणाचे पॅकेट्स, मास्क, सॅनिटायझर व औषधांचे वितरण करण्यात आले. तसेच स्थलांतरित मजूर, वृद्ध, महिला, दिव्यांग व रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबांना विशेष मदत करण्यात आली.

आरोग्यविषयक जनजागृतीसाठी कोविड-१९ प्रतिबंधक उपाययोजना, लसीकरणाचे महत्त्व, स्वच्छता व सुरक्षिततेबाबत माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली. गरजू रुग्णांना रुग्णालयीन उपचार, ऑक्सिजन, औषधे व आवश्यक तेथे आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी संस्थेने सक्रिय भूमिका बजावली.

Bhimpanther Bahujan Foundation चे हे कार्य सामाजिक एकोपा, बंधुता व सेवा भावनेचे उत्तम उदाहरण असून संकटाच्या काळात समाजासाठी उभे राहण्याची संस्थेची कटिबद्धता अधोरेखित करते.

आमच्या भिमपँथर जनसंपर्क कार्यालय च्या वतीने👆19 फेब्रुवारी “छत्रपती शिवाजी महाराज जयंती” मोठ्या उत्साहत साजरी करण्यात आली.. सर्व शिवभिम प्रेमी जनसमुदयांचे मनःपूर्वक आभार 🙏धन्यवाद ❤️जय शिवराय 🙏जय भिम!.

भिमपँथर बहुजन फाउंडेशन (भारत)आंदोलन…

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महपरिनिर्वान दिनी ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.

भिवंडी टोरंट पॉवर आंदोलन…!

ठाणे स्टेशनं ते कोर्ट नाका ठाणे यां ठिकाणी महा-विराट मोर्चा💪
बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन👍

भिमपँथर बहुजन फाउंडेशन च्या वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आयु. सुशील शिंदे यांच्या आयोजनातून क्रिकेट सामने ठेवण्यात आले होते.